Goa Election : गोव्यातील जनता कुणाला वेचणार? मतदानाचा 'माझा'वर ग्राऊंड रिपोर्ट ABP Majha
गोव्यासह तीन राज्यांत आज विधानसभा निवडणुकीचं मतदान होतंय. गोवा आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात आज निवडणूक होतेय. तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. गोव्यात ४० जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात आहेत. तर उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी ६३२ उमेदवारांचं भवितव्य आज मतदार ठरवणार आहेत. उत्तर प्रदेशात ऊस पट्ट्यातलं मतदान झाल्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात मुस्लिम बहुल प्रदेशातील ५५ जागांसाठी आज निवडणूक होतेय. तिथं ५८६ उमेदवार रिंगणात आहेत.