शेअर बाजारात पडझड, Mukesh Ambani यांनी मागे टाकत Gautam Adani देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
abp majha web team
Updated at:
26 Jan 2022 11:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेले दोन दिवस शेअर बाजारात झालेल्या चढउताराचा फटका रिलायन्सला बसलाय आणि त्यामुळे सर्वात श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानीनी अव्वल स्थानही गमावलं. त्यांची जागा गौतम अदानींनी घेतलीय. अंबनींच्या कमाईत घसरण झाल्यानं गौतम अदानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेत. फोर्ब्सच्या रियल-टाईम नेटवर्क डेटानुसार अदानींची संपत्ती 6.72 लाख कोटी रुपये झाली, तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 6.71 लाख कोटी रुपये आहे. संपत्तीच्या बाबतीत अदानी आता जगात 11व्या क्रमांकावर आहेत.