Chocolate Ganesh : लुधियानातल्या शेफची अनोखी गणेशभक्ती, साकारला चॉकलेट गणपती
Continues below advertisement
Ganesh Chaturthi 2021 : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन होत आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात पार पडत आहे.
लुधियानातल्या एका गणेशभक्त शेफने चॉकलेटचा वापर करुन बाप्पाची मूर्ती साकारली आहे.
Continues below advertisement