Gandhi Jayanti : राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आदरांजली

Gandhi Jayanti 2021 :  देशभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152वी जयंती.  सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर जीवन व्यतित करणाऱ्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचं योगदान असलेल्या महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर इथं 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांची सत्ता उलथवून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश सर्वात मोठ्या अहिंसेच्या पुजाऱ्याला विनम्र आदरांजली वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola