G20 Summit 2023 Updates : जगातील 20 सामर्थ्यवान देशांच्या प्रमुखांची जी-20 परिषद दिल्लीत

जगातील 20 सामर्थ्यवान देशांच्या प्रमुखांच्या जी-२० परिषदेला आज दिल्लीत सुरुवात होतेय. या परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाली असून सुरक्षेसाठी अत्यंत कडक उपाययोजना करण्यात आल्यात. आज सकाळी साडेनऊ ते साडेदहा या दरम्यान, जी-२०च्या सर्व नेत्यांचं प्रगती मैदानातील भारत मंडपमध्ये आगमन होईल. त्यानंतर जी-२० परिषदेतील पहिलं सत्र म्हणजे ONE EARTH ला सुरुवात होईल. दुपारच्या जेवणानंतर तीन ते पावणेपाच पर्यंत ONE FAMILY हे दुसरं सत्र असेल. त्यानंतर रात्री ८ ते सव्वा नऊ या वेळेत सर्व राष्ट्रप्रमुखांची पुन्हा चर्चा होईल. तर संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत जी-२०च्या नेत्यांसाठी राष्ट्रपतींकडून विशेष डिनरचं आयोजन करण्यात आलंय. आज आणि उद्या ही परिषद असून त्यासाठी दिल्लीत कालपासून तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola