Former Union minister Jaswant Singh passes away | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन

Continues below advertisement
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी महत्वाच्या विभागाची धुरा सांभाळली होती. राजस्थानच्या बडमेरचे जसवंत सिंह यांनी वित्त, परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी जसवंत सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram