लसीकरणाच्या संख्येपेक्षा टक्केवारीवर लक्ष केंद्रीत करा, मनमोहन सिंह यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना व्हायरसच्या वाढत्या परिस्थितीसंदर्भात भाष्य केलं आहे.  पत्र लिहून त्यांनी म्हटलं आहे की, कोविड लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार सर्व देशभर करणं गरजेचं आहे.  

मनमोहन सिंह यांनी म्हटलं आहे की, कोरोना विरोधातील लढाईत मुख्य शस्त्र आहे लसीकरण करण्याचं. त्यांनी म्हटलं आहे की, लसीकरणाच्या संख्येवर नाही तर देशाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या प्रमाणात लसीकरण होणं आवश्यक आहे. लसीकरणाच्या टक्केवारीवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. सध्या भारतात एकूण लोकसंख्येच्या काही टक्केच लसीकरण झालं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola