Lakhimpur Kheri News: कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं ABP Majha

Continues below advertisement

Lakhimpur Kheri News : यूपीच्या लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्याच्या कथित कार अपघातावरून गोंधळ उडाला आहे. अपघातानंतर शेतकरी संतप्त आहेत. लखीमपूर खेरीचे डीएम अरविंद चौरसिया यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार यात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती अतिशय तणावपूर्ण आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि भारतीय किसान युनियनने लखीमपूर गाठण्याचे आवाहन केले आहे. हजारो शेतकरी आधीच येथे पोहोचले आहेत. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा अभय मिश्रा मोनू यांच्यावर शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. काही शेतकरी संघटनांनी गोळीबार केल्याचा आरोपही केला आहे.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या समर्थकांच्या कथित वाहनाने धडक दिल्याने दोन शेतकरी जखमी झाल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. संतप्त शेतकऱ्यांनी दोन वाहनांना आग लावली. सांगितले जात आहे की जळालेल्या दोन वाहनांपैकी एक वाहन केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचे आहे. उद्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी लखीमपूर खेरीला जाऊ शकतात अशीही बातमी आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram