Final Year Exam | अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्या निकाल येण्याची शक्यता
विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याचा निर्णय उद्या होणार आहे. कारण यासंदर्भात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्ट उद्या आपला निकाल देणार आहे. उद्या सकाळी 10.30 वाजता तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ याबाबत आपला निकाल देईल. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. त्याविरोधात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या गटाच्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या.