Farmers Tractor Rally | सिंघू सीमेवरुन ट्रॅक्टर परेडला सुरुवात

Continues below advertisement

Republic Day 2021 गेल्या 60 दिवसांहून अधिक काळापासून दिल्लीमध्ये सिंघू सीमेवर हजारो शेतकरी केंद्राच्या दडपशाची विरोध करत ठाण मांडून बसले आहेत. केंद्रानं आखलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. याच आंदोलनात आज, म्हणजेच देशाच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनी (72 nd Republic Day 2021) अत्यंत महत्त्वाचं वळण येणार आहे. कारण या खास दिवसाचं औचित्य साधत हजारो शेतकरी दिल्लीमध्ये प्रवेश करणार आहेत. ट्रॅक्टर परेडच्या माध्यमातून हजारो शेतकरी सीमोल्लंघन करत दिल्लीत प्रवेश करणार आहेत.

शेतकरी प्रजासत्ताक परेड म्हणजेच 'किसान गणतंत्र परेड' ही सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमा ओलांडत दिल्लीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळं साऱ्या राष्ट्राचं या परेडकडेही लक्ष लागून राहिलं आहे. एकिकडे ट्रॅक्टर परेडची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे शेतकरी संघटनांनी सोमवारी एक घोषणा करत देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारीला विविध ठिकाणांहून संसदेकडे कूच करण्याचा इशाराही दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram