Farmers Strike : दिल्लीतल्या सीमेवरील शेतकरी आंदोलन आज संपणार? ABP Majha
Continues below advertisement
कृषी कायदे मागे घेण्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापासून दिल्लीतल्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आज संपण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीची दिल्लीत बैठक होतेय. हमीभावाबाबत समिती, याचिका मागे घेण्याबाबत शेतकरी आणि सरकारमध्ये सहमती झाल्याची माहिती मिळतेय. मात्र आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची सरकारने घोषणा करावी त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात येईल अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. तर आधी आंदोलन मागे घ्या त्यानंतर गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली जाईल अशी सरकारची भूमिका आहे.
Continues below advertisement