Farmers Tractor Rally | शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात; दिल्लीच्या सीमेवर मोठा फौजफाटा तैनात
शुक्रवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी आंदोलक शेतकऱ्यांनी टॅक्टर रॅली काढून थेट सरकारला इशारा दिलाय. या आधी 26 जानेवारीला शेतकऱ्यांनी टॅक्टर रॅली काढण्याचं जाहीर केलं होतं, आजची टॅक्टर रॅली त्याची रंगीत तालीम असल्याचं सांगण्यात येतंय. दिल्लीच्या चारही सीमांच्या भोवतीने हे टॅक्टर दिल्लीला वेढा घालणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.