Farmers Protest | केंद्र सरकारचा कृषी कायदे रद्द करण्यास नकार; शेतकरी मात्र ठाम

Continues below advertisement
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 13 दिवसांपासून शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला वेढा दिला आहे. शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मजबूत करण्यासाठी मंगळवारी देशव्यापी बंदची हाक दिली होती. अशातच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आक्रोशापुढे नमतं घेत केंद्र सरकारसोबत होणारी सहाव्या फेरीतील बैठक 9 डिसेंबर ऐवजी एक दिवस अगोदर म्हणजेच, 8 डिसेंबर रोजी घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली. दरम्यान, सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील ही बैठकही निष्फळ ठरली आहे. बैठकीत शेतकरी प्रतिनिधी मात्र त्यांच्या मागणीवर ठाम असून सरकारने कृषी कायदे रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकरी नेत्यांची आज केंद्र सरकारसोबत बैठक होणार नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram