BIG BREAKING | शेतकऱ्यांची बंधनातून मुक्ती! शेतकरी देशात कुठेही स्वत: विकू शकणार शेतमाल

Continues below advertisement
शेतकऱ्यांवर आजवर लादलेल्या बंधनातून मुक्ती मिळण्याची शक्यता तयार झाली आहे. राज्य सरकारने सर्व शेतमालाच्या संपूर्ण नियमन मुक्तीच्या अंमलबजावणीचे आदेश काढला आहे. केंद्र सरकारने ह्या संदर्भातले तीन अध्यादेश यापूर्वीच जारी केले आहेत. राज्य शासनाच्या पणन संचालकांनी हे आदेश दिले आहेत.  या आदेशामुळे 'एक देश एक बाजार' योजना राज्यात लागू झाली आहे. आता त्यामुळे बाजार समितीच्या आवारा-बाहेर होणाऱ्या शेतमालाच्या खरेदी-विक्रीवर कोणतेही बाजार शुल्क आकारले जाणार नाही. तसंच मोठ्या कंपन्या थेट शेतकऱ्यांकडून अन्न धान्य खरेदी करू शकतील किंवा शेतकरी स्वत: देशात कुठेही विकू शकेल.

2014 मध्ये राज्य शासनाने फळे आणि भाजीपाला नियमन मुक्त केला होता. आता अन्नधान्य देखील नियुक्त केले आहेत. मात्र हे करत असताना बाजार समित्यांचे आस्तित्व कायम ठेवण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram