EWC Hearing : आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षणाची वैधता लवकरच ठरणार, 13 सप्टेंबरपासून सुनावणी
Continues below advertisement
आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षणाची वैधता सर्वोच्च न्यायालयात लवकरच ठरणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाच्या वैधतेबाबत 13 सप्टेंबरपासून घटनापीठापुढे नियमित सुनावणी होणार आहे. त्यासाठी 5 दिवस निश्चित करण्यात आले आहेत. याच काळात राज्यांनाही आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. केंद्र सरकारनं दिलेलं आर्थिक आरक्षण टिकणार का याचा फैसला या सुनावणीत होणार आहे.
Continues below advertisement