GOA | मनोहर पर्रिकर यांच्यावरील 'एक मनोहर कथा' पुस्तकाचं प्रकाशन

ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर यांनी केंद्रीय मंत्री तसंच गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर लिहिलेल्या 'एक मनोहर कथा' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात नुकतंच गोव्यात आलंय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला लेखिका मंगला खाडिलकर यांच्यासह नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठे तसंच गोवा प्रदेश भाजप कार्यकारिणी अध्यक्ष सदानंद तनावडे आदी मान्यवर उपस्थित होते. मनोहर पर्रिकर यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे पैलू या पुस्तकातून उलगडण्यात आलेत.  नवचैतन्य प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलंय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola