PM Modi | नरेंद्र मोदींची आठ उत्तरे | ABP Majha
देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाचा पंतप्रधान मोदींनी जोरदार समाचार घेतला. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी विरोधक कुठल्याही थराला जात आहेत. खोटी माहिती, फेक व्हीडिओ आणि चिथावणीखोर भाषणं पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम विरोधक करत असल्याची टीका मोदींनी केलीय. तुम्हाला विरोध करायचा असेल तर माझे पुतळे जाळा, पण हिंसाचार करुन सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करु नका, असं आवाहन मोदींनी केलंय.