Edible Oil Price Hike : खाद्यतेल पुन्हा महागणार? आयात शुल्क स्थिरावल्याने दरवाढीची शक्यता
Continues below advertisement
दैनंदिन गरजेचं खाद्यतेल पुन्हा एकदा महागण्याची शक्यता आहे. खाद्यतेलावरील आयात महागल्याचे परिणाम खाद्यतेलांच्या दरावर दिसण्याची शक्यता आहे. खाद्यतेलांचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्रानं आयात शुल्कात कपात केली होती. मात्र आता आयत शुल्क स्थिर झाल्यानं दरावर पुन्हा परिणाम होण्याचा अंदाज आहे. दैनंदिन गरजेचं सर्व धान्य जीएसटी मुक्त असताना खाद्यतेलावर मात्र जीएसटी आकारण्यात येतो. त्यामुळे दरनियंत्रणासाठी सरकारनं हा जीएसटी रद्द करावा अशी मागणी खाद्यतेल महासंघाकडून करण्यात येतेय.
Continues below advertisement