Delhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी ABP Majha
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी होणार आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं राहुल गांधी यांची दिल्लीत काल तब्बल १० तास चौकशी केली. त्यात राहुल गांधी यांनी ईडीच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. तर काही प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. काल रात्री साडेअकरा वाजेपर्यंत राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. एकीकडे राहुल गांधी यांची चौकशी सुरु असताना देशभरातले काँग्रेस नेते त्याविरोधात काल रस्त्यावर उतरले होते. शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठिकठिकाणी ताब्यात घेतलं. काही ठिकाणी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केलाय.