Kashi Vishwanath Temple | काशी विश्वनाथ मंदिरात आता ड्रेसकोड लागू | ABP Majha
वाराणसीतील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पुरूष आणि महिलांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. नव्या ड्रेसकोडनुसार, काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी पुरूषांना धोतर आणि कुर्ता तर महिलांना साडी परिधान करणं आवश्यक असणार आहे. पॅन्ट, शर्ट, जीन्स परिधान केलेल्या व्यक्तींना लांबून दर्शन घ्यावं लागणार आहे. म्हणजेच, त्यांना शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेता येणार नाही, अशी माहिती मिळत आहे.