Oxygen Usage : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑक्सिजन वापरा, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली : डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना, पीएम केअर्स फंड अंतर्गत, कोविड-19 रुग्णांसाठी वैद्यकीय ऑक्सिजननिर्मिती करणारे प्लांट उभारणार आहे. भारताची हलक्या वजनाची लढाऊ जहाजे तेजससाठी विमानात नेता येईल असा ऑक्सिजन निर्माण  करण्याचे तंत्रज्ञान डीआरडीओच्या DEBEL या विभागाने विकसित केले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर या प्लांटसाठीही केला जाणार आहे. या प्लांटमध्ये प्रति मिनिट 1000 लिटर ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता आहे. या व्यवस्थेमुळे, पाच लिटर प्रती मिनिट या वेगाने 190 रूग्णांना दिवसभर ऑक्सिजन पुरवला जाऊ शकतो. तसेच, 195 सिलेंडर देखील भरले जाऊ शकतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola