Dr Babasaheb Ambedkar : स्मारकाचं काम 2024 मध्ये पूर्ण होणार;धनंजय मुंडे,वर्षा गायकवाड यांना विश्वास
Continues below advertisement
इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी काम सुरू आहे. जवळपास साडेचारशे फुटांचा हा पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार करणार आहेत. हे काम सुरू करण्यापूर्वी राम सुतार यांनी मुख्य पुतळ्याची २५ फुटी प्रतिकृती साकारली आहे. या प्रतिकृतीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारची उपसमिती आज गाझियाबादमध्ये दाखल झाली आहे... उपसमितीची पाहणी झाल्यानंतर पुतळ्याला आज अंतिम मान्यता दिली जाणार आहे. त्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मंत्री वर्षा गायकवाड आणि विभागाचे अधिकारी गाझियाबादमधील शिल्पकार राम सुतार यांच्या वर्कशाॅपमध्ये दाखल झाले आहेत.. या पुतळ्याला अंतीम मान्यता दिल्यानंतर आजपासून पुढील कामाला सुरुवात होणार आहे.
Continues below advertisement