China Cyber Attack | ईमेलद्वारे आलेली संशयित अटॅचमेंट उघडू नका, चीन भारतावर सायबर अटॅकच्या तयारीत
नवी दिल्ली : चीनच्या कुरापती काही थांबायच्या नाव घेताना दिसत नाही. भारत-चीन सीमेवरील झटापटीनंतर चीनने आता भारताविरुद्ध नवे हत्यार उपसले आहे. हे हत्यार आहे सायबर अॅटकचे. सुत्रांच्या माहितीनुसार चीन भारतावर 21 जुनपासून सायबर अॅटक करण्याच्या तयारीत आहे. हा हल्ला इमेलच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा अॅटक ncov2019.gov.in या ईमेल मधून होण्याची शक्यता आहे. या ईमेलचा विषय 'Free Covid 19 Test' असा असू शकतो.
Tags :
Data Theft Unknown Email China Cyber Attack Cyber Theft China Attack Cyber Cell Data Leak Cyber Attack