Dharashiv Solapur Railway : धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांना लवकरच रेल्वे मार्ग मिळणार
Dharashiv Solapur Railway : धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांना लवकरच रेल्वे मार्ग मिळणार
धाराशिव- सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्याला जोडणाऱ्या नवा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी आज टेंडर काढण्यात आले आहे. ३० किलो मिटर अंतराच्या या कामावर अंदाजित ५४४ कोटी रूपये खर्च होणार आहे.
या नव्या मार्गामुळे सोलापूर धाराशिव या नव्या ट्रॅकवर तुळजाभवानीचे तुळजापर हे स्थानक आले आहे. भारतीय रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत तुळजापूरच्या संरेखनासह सोलापूर आणि धाराशिव दरम्यान नवीन BG लाईन बांधण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. हा मार्ग सोलापूर तुळजापूर-वडगाव-सांझा-धाराशिव असा असेल.