Dhanush- Aishwarya: धनुष- ऐश्वर्या विभक्त होणार, सोशल मीडियावर दिली माहिती ABP Majha

तामिळ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जोडी अर्थात अभिनेता धनुष आणि त्यांची पत्नी  ऐश्वर्या धनुष यांनी विभक्त होत असल्याची घोषणा केलेय. धनुष आणि ऐश्वर्या यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून एकसारखीच पोस्ट करत या घटस्फोटाची घोषणा केलेय. व्यक्तीगत पातळीवर स्वतःचा शोध घेण्यासाठीच विभक्त होत असल्याचं या दोघांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. धनुष आणि ऐश्वर्या यांचा विवाह २००४ मध्ये झाला होता. त्यांना दोन मुलं आहेत. ऐश्वर्या ही दाक्षिणात्य सूपरस्टार रजनीकांत यांची कन्या आहे. १८ वर्षांच्या संसारानंतर या जोडप्यानं काडीमोड घेण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola