Devendra Fadnavis Meet Amit Shah : फडणवीसांची राजीनाम्याची मागणी; मोदी शाह काय निर्यण घेणार?
देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची आज दिल्लीत भेट झाली... सरकारमधून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली.. मात्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती मिळतेय... राजीनामा देण्याचा निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिलीये...फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा मानस असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यावर दिल्लीतल्या बैठकीत चर्चा झाली... दिल्लीला जाण्याआधी फडणवीसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली..
एबीपी माझाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली असून या भेटीत फडणवीसांच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, या भेटीदरम्यान, राज्यातील पराभवाच्या कारणांवर झाली सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी रचनात्मक काम करण्याची इच्छा अमित शाह यांना बोलून दाखवली. पण, राजीनाम्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती मिळत आहे.