Gupteshwar Pandey|गुप्तेश्वर पांडेंचा बिहार विधानसभेच्या रिंगणातून पत्ता कट,पांडेंनी केली मोठी घोषणा
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना जेडीयूकडून तिकिट देण्यात आलेलं नाही. गुप्तेश्वर पांडे यांनी नुकतंच डीजीपी पदाचा राजीनामा देत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते बक्सरमधून विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र काल पक्षाने आपल्या कोट्यातील सर्व 115 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. या यादीमध्ये गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाही. बक्सरची जागा युतीमध्ये भाजपच्या खात्यात गेली असून भाजपकडून या जागेवर परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाली आहे. यानंतर निराश झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.