Delhi Waterlogging : यमुनेच्या पातळीत वाढ , राजधानी दिल्लीत जलकोंडी
उत्तरेकडील राज्यांवरील पावसाच्या वक्रदृष्टीमुळे यमुनेच्या पातळीत लक्षणीय वाढ झालीय. परिणामी दिल्लीत जलकोंडी झालीय. यामुळे दिल्लीकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागत असून त्यांच्या हालाला पारावर उरलेला नाही. यमुनेची पातळी वाढल्याने दिल्लीकर जलकोंडी आणि वाहतूक कोंडीने बेजार झालेत. दिल्लीतील वाहतूक व्यवस्था कोलमडून गेलीय. दिल्लीच्या यमुना बाज़ार, आईटीओ, राजघाट, सिव्हील लाईन, कश्मीरी गेट यांसारख्या अनेक परिसरात पाणी साचलंय. त्यात दिल्लीतील शास्त्री पार्कच्या आजूबाजूच्या परिसरात वाहतूक खोळंबल्यानं नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. तर लाल किल्ला देखील पाण्याखाली गेलाय.