ABP News

Delhi Vidhan Sabha Election Exit Poll : केजरीवालांच्या आपची पुन्हा सत्तेत येण्याची संधी हुकण्याची शक्यता

Continues below advertisement

बहुतांशी एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येण्याचा अंदाज...केजरीवालांच्या आपची पुन्हा सत्तेत येण्याची संधी हुकण्याची शक्यता...

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचे मतदान आज (5 फेब्रुवारी) पार पडले आहे. मतदारराजाचा कौल आता मतपेटीत कैद झाला असून दिल्लीच्या सिंहासनी नेमकं कोण विराजमान होणार हे निकालाच्या दिवशीच कळणार आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक झाली असून आता 8 फेब्रुवारी रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र या निवडणूकीचे आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विविध सर्वेक्षण संस्थांनी संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोलचे (Exit Poll Delhi) निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाला (आप) मोठा फटका बसताना दिसत आहे. 25 वर्षांनंतर दिल्लीत भाजप पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे.

एक्झिट पोलनुसार 2025 ला कुणाचे पारडं जड?

चाणक्य स्ट्रॅटेजीजचा एक्झिट पोल
भाजपचा- 39-44 जागा
आप- 25-28 जागा 
काँग्रेसला - 2-3 जागा 

पोल डायरीचा एक्झिट पोल

भाजपचा अंदाज 42-50 जागा - पोल डायरी
AAP साठी 18-25 जागा शक्य - पोल डायरी
काँग्रेसला 0-2 जागा मिळण्याची शक्यता - पोल डायरी
45% मते भाजपला, 42% मते AAP - पोल डायरी

पीपल्स इनसाइटचा एक्झिट पोल

भाजपला 40-44 जागांचा अंदाज - पीपल्स इनसाइट
AAP 25-29 जागांचा अंदाज - पीपल्स इनसाइट
काँग्रेसचा अंदाज ०-१ जागा - पीपल्स इनसाइट 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram