Onion Export Ban | कांदा निर्यात बंदी ही केंद्र सरकारची चूक, उदयनराजेंचा मोदी सरकारला घरचा आहेर
खासदार उदयनराजे भोसले कोणत्याही पक्षात असोत ते कायमच आपल्या भूमिकांवर ठाम असतात. राष्ट्रवादीत असतानाही त्यांनी अनेकदा पक्षाला घरचा आहेर दिला होता. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून आजपर्यंत त्यांनी पक्षविरोधी वक्तव्य केलं नव्हतं. मात्र आता त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आवाज उठवताना थेट मोदी सरकारच्याच निर्णयाचा विरोध केला आहे.