Maratha Reservation | मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, अंतरिम आदेश देणार
मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होईल. मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या संदर्भात अंतरिम आदेश आज सुप्रीम कोर्ट देण्याची शक्यता आहे. या अंतरिम आदेशावर मराठा आरक्षणाअंतगर्त पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाचं भवितव्य ठरणार आहे. ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल महाराष्ट्र सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडणार आहेत.