Delhi Service Bill Passed : दिल्ली सेवा विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर ABP Majha

Delhi Service Bill Passed : दिल्ली सेवा विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर ABP Majha

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूनं १३१ मतं तर विरोधात १०२ मतं पडली. या विधेयकावर राज्यसभेतल्या मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल गैरहजर होते. पण शरद पवार, फौजिया खान आणि वंदना चव्हाण हे राष्ट्रवादीचे अन्य खासदार मतदानासाठी उपस्थित होते. त्या तिघांनीही विधेयकाविरोधात मतदान केलं. पण अजित पवारांसोबत गेलेल्या प्रफुल पटेल अनुपस्थित राहिले आणि पक्षातल्या अंतर्गत वादात राष्ट्रवादीनं कारवाईचा मुद्दा शिताफीनं टाळल्याचं समोर आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola