Delhi Rohini Court : गँगस्टरची गोळ्या घालून हत्या, वकिलाच्या वेशात आलेल्या शूटर्सचंही एन्काऊंटर
Continues below advertisement
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दिल्लीतल्या रोहिणी कोर्ट (Delhi Rohini Court) परिसरात झालेल्या गँगवॉरमध्ये जितेंद्र गोगी (jitendra gogi) नावाच्या गुन्हेगाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर हे टिल्लू गँगचे शूटर असून ते वकिलाच्या वेशात आले होते. जितेंद्र गोगीवर गोळी झाडणाऱ्या दोघांचा दिल्ली पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले असल्याची देखील माहिती आहे.
Continues below advertisement