Delhi Republic Day 2022: राजपथावर कला, संस्कृती, शौर्याचं दर्शन ABP Majha
Continues below advertisement
७३ व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर देशाच्या समृद्ध संस्कृतीचं आणि सामर्थ्यवान भारताचं दर्शन झालं. राफेलसह विविध ७५ विमानांच्या कसरतींनी डोळ्यांचं पारणं फिटलं, तर सांस्कृतिक सादरीकरणात सूर, ताल आणि नृत्याचा कलाविष्कार पाहायला मिळाला. विविध राज्यांच्या आणि खात्यांच्या कल्पक चित्ररथांचं संचलन लक्षवेधी ठरलं. त्यात जैवविविधता दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथानंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थित झालेल्या राजपथावरील या सोहळ्यात कला, संस्कृती आणि शौर्याचं अनोखं दर्शन घडलं.
Continues below advertisement