Delhi Blast: 'लाल किल्ल्याजवळ स्फोटात ८ ठार, ३० हून अधिक जखमी', गृहमंत्री अमित शाह यांची माहिती
Continues below advertisement
राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या भीषण कार स्फोटात (Car Explosion) आठ जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लक्ष घातले आहे. 'या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून तीस पेक्षा अधिक जण जखमी आहेत,' अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील सिग्नलवर संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या अनेक गाड्यांनी पेट घेतला. फरीदाबादमध्ये नुकत्याच झालेल्या एका कारवाईनंतर हा स्फोट घडवण्यात आला आहे का, या दिशेने तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, साक्षीदारांनी दोन मोठे आवाज ऐकल्याचे सांगितले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement