Salary Cutting Issue | पगारात कपातीच्या केंद्र सरकारच्या आदेशात गृह सचिवांकडून बदल
लॉकडाऊनच्या काळात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करु नये, असा आदेश केंद्र सरकारनं दिला होता. मात्र, आता हा आदेश सरकारनं मागे घेतलाय. २९ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय मुख्य सचिवालयाकडून कंपन्यांना काही दिशानिर्देश देण्यात आले होते. त्यानुसार कंपन्या बंद असल्या तरी कामगारांना त्यांचा महिन्याचा पूर्ण पगार द्या, असे आदेश देण्यात आले होते. मात्र आता हा आदेश रद्द करण्यात आल्यानं कामगारांच्या पगारात कपात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केलीय.