JNU Violence | जेएनयूतल्या राड्याप्रकरणी दिल्ली पोलिसात गुन्हा नोंद | ABP Majha
Continues below advertisement
जेएनयूतल्या राड्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. गोंधळ घालून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवलाय. तर गृहमंत्री अमित शाहांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्याशीही फोनवरुन बातचित केल्याचं कलतंय. दरम्यान, काल रात्री जेएनयूतल्या साबरमती हॉस्टेलमध्ये काल तोंड झाकून आणि हातात लाठ्या-काठ्या घेऊन अज्ञातांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केलाय. त्यात जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयेशी घोषसह १८ जण गंभीर जखमी झालेत...जखमींना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय..
Continues below advertisement