Farmers Protest | Greta Thunbergने अपलोड केलेल्या टूलकिटबाबत दिल्लीत गुन्हा दाखल

Continues below advertisement

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने हिने ट्विटरवर अपलोड केलेल्या टूलकिटबाबत गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी आंदोलनाबद्दल ग्रेटाने एक ट्वीट केलं होतं. ज्यात या टूलकिटचा उल्लेख करण्याता आला होता.

दिल्ली सीमाभागात झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिस सोशल मीडियावर करडी नजर ठेऊन आहे. आतापर्यंत पोलिसांनी 300 सोशल मीडिया हँडल निलंबित केले आहे. यात (ग्रेटाचं नाव न घेता) तीने अपलोड केलेल्या टूलकिट वर नजर ठेवली जात आहे. या टूलकिटच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्याचा कट रचला जात होता. भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा डाव होता. याबाबत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 124 ए (राजद्रोह), 153 ए, 153 आणि 120 बी अंतर्गत फिर्याद दाखल केली. एफआयआरमध्ये ग्रेटाचे नाव लिहिलेले नाही, आम्ही तिच्या ट्विट आणि टूलकिटवर गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास करत आहोत. दिल्ली पोलिसांचे सायबर सेल याचा तपास करत आहे.

पॉप गायिका रिहानानंतर, पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक जागतिक ख्यातनाम व्यक्तींनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले. यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण आधी वस्तुस्थिती तपासून घ्यावी, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram