Delhi JNU : जेएनयूत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत राडा, 25 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
दिल्लीतील जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आलंय. बीबीसीची इंडिया-द मोदी क्वेश्चन ही डॉक्युमेंट्री दाखवण्याची घोषणा विद्यार्थांनी केली होती. मात्र त्याला जेएनयूच्या प्रशासनाने परवानगी नाकारल्याने नवा वाद निर्माण झालाय. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी संतप्त झाले. त्यात एबीव्हीपी आणि लेफ्टविंगच्या विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याचं समजतंय. दरम्यान, डॉक्युमेंट्री दाखवण्याच्या नियोजित वेळेआधीच वीज पुरवठा बंद करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. या प्रकरणात विद्यार्थ्यांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनबाहेर धरणं आंदोलन केलंय. पोलिसांनी २५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केलाय. आता विद्यार्थी या प्रकरणात कुलगुरूंकडे तक्रार करणार आहेत.
Continues below advertisement