Oxygen Shortage : दिल्ली सरकारने ऑक्सिजन प्लांट का उभारले नाही?ऑक्सिजन तुटवड्यावर हायकोर्टात सुनावणी

Continues below advertisement

नवी दिल्लीः देशभरात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. काही राज्य कोरोनाच्या संक्रमणानं अधिक बाधित झाली आहेत. यात दिल्लीचा देखील समावेश आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळं ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. आज दिल्ली हायकोर्टने आज ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हायकोर्टानं म्हटलं आहे की, ही कोविडची लाट नाही तर सुनामी आहे. ऑक्सिजन पुरवठ्याला जर केंद्र, राज्य तथा स्थानिक प्रशासनातला कुणी अधिकारी अडथळा आणत असेल तर त्यांना आम्ही फासावर लटकवू, असं हायकोर्टानं म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram