
Delhi Hanuman Jayanti Violence : जहांगीरपुरीत गोळीबार करण्याच्या आरोपाखाली 2 सख्खे भाऊ अटकेत
Continues below advertisement
दिल्लीच्या जहांगीरपुरी हिंसाचाराच्या घटनेत गोळी चालवल्याच्या आरोपाखाली दोन सख्या भावांना ताब्यात घेण्यात आलंय. सध्या १४ आरोपींना पोलिसांनी अटक केलंय. काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांचा आणि अन्सार नावाच्या व्यक्तीचा वाद झाला आणि त्यानंतर दगडफेक आणि हिंसाचाराला सुरुवात जाली अशी माहिती पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये देण्यात आलीय. या हिंसाचारावेळी गोळीबार करणारा आरोपी अस्लम आणि अंसारसह एकूण १४ जणांना अटक करण्यात आलीय. अस्लमकडून पोलिसांनी पिस्तुल जप्त केल्याचीही माहिती मिळतेय.. या हिंसाचारात ७ पोलीस आणि दोन नागरिकांसह ९ जण जखमी झालेत. सध्या इथे तणावपूर्ण शांतता आहे.
Continues below advertisement