Betting to be legal? | भारतात सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळणार? अनुराग ठाकूर यांचे सूतोवाच
भारतात सट्टेबाजी कायदेशीर करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी (19 नोव्हेंबर) एका कार्यक्रमात याचे संकेत दिले. अनुराग ठाकूर म्हणाले की, सट्टेबाजी कायदेशीर झाल्यास सरकारला हजारो कोटी रुपयांचा महसूलही मिळेल. अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.