Farmers Protest | शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये आज चर्चा, अटी शर्तींशिवाय चर्चा करण्यास सरकार तयार

Continues below advertisement
नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील पाच दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमले आहेत. शेतकरी मागे हटण्यास तयार नसल्याने आता त्यांचं आंदोलन आणखी चिघळू नये यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. आज (1 डिसेंबर) दुपारी तीन वाजता विज्ञान भवनात सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये बातचीत होणार आहे. खरंतर सरकारने चर्चेसाठी तीन डिसेंबरची तारीख ठरवली होती पण आंदोलनाचा नूर पाहता ती दोन दिवस आधीच होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram