Delhi Farmer Protest : दिल्लीत कोरोनाचा कहर, गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच, काय आहे परिस्थिती?

Continues below advertisement

नवी दिल्ली :  कोरोनाची दुसरी लाट गडद होत असताना दिल्लीतलं शेतकरी आंदोलन नेमकं कसं सुरु आहे. शेतकरी अजूनही रस्त्यावर आंदोलन करत ठाण मांडून आहेत का असे अनेक प्रश्न विचारले जातायत. तर कोरोनाच्या सावटात हे शेतकरी आंदोलन कसं सुरु आहे, याबाबत जाणून घेऊयात.

दिवस 142..हिवाळा संपला..उन्हाळा सुरु झाला.कोरोनाची पहिली लाट गेली. आता दुसरी आली. पण दिल्लीतलं शेतकरी आंदोलन अजूनही सुरुच आहे. गाझीपूर सीमेवर जवळपास दोन किलोमीटर लांबवर हे तंबू अजूनही आपले आंदोलनाचे झेंडे फडकावत उभेच आहेत. शेतकऱ्यांची संख्या थोडीशी कमी असली तरी तंबू मात्र हटलेले नाहीत.लंगरही उभेच आहेत. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हटणार नाही असा त्यांचा निर्धार कायम आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram