Exam cancellation letter Arvind Kejriwal | विद्यापीठ परीक्षा रद्द करण्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Continues below advertisement

नवी दिल्ली : अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन महाराष्ट्रात सुरु असलेलं राजकारण आता राष्ट्रीय पातळीवर पोहचल्याचं दिसत आहे. काल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी परीक्षा रद्द केल्याची मागणी केली होती. त्यानंतर आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे.

यूजीसीच्या सुधारित गाईडलाईन्स आल्या त्याआधीच देशातल्या सात राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांनी आपल्या आपल्या राज्यात परीक्षा रद्द केलेल्या होत्या. त्यात आज दिल्लीचीही भर पडली. दिल्ली सरकारने आपल्या अखत्यारित येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्गाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ हा निर्णय देशातल्या सर्वच ठिकाणी, सर्वच केंद्रीय विद्यापीठांसाठीही लागू व्हावा, अशी मागणी करत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram