Delhi Red Fort Blast : दिल्लीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा वाढला, मुंबईत हाय अलर्ट

Continues below advertisement
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरात खळबळ उडाली असून मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. या घटनेनंतर ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम (Prashant Kadam) यांनी सरकारच्या उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'देशातल्या स्फोटांची जी मालिका UPA सरकारच्या काळामध्ये होत होती, ती आमच्या सरकारमध्ये थांबलेली आहे, असं देशाच्या गृहमंत्र्यांनी (Home Minister) अगदी अभिमानानं सांगितलेलं होतं, आता जर ही घटना देशाच्या राजधानीमध्ये होत असेल तर याच्याबद्दल उत्तरदायित्व नेमकं कोणाचं आहे?', असा सवाल त्यांनी केला. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) आणि उत्तर प्रदेशमध्ये (UP) हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, घटनेच्या काही तास आधी फरीदाबादमध्ये (Faridabad) साडेतीनशे किलो RDX जप्त करण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का, या दिशेने NIA आणि NSG चे पथक तपास करत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola