Delhi Amit Shah :कंझावाला अपघात आणि मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी घेतली गंभीर दखल

Continues below advertisement

दिल्लीतील कंझावाला अपघात आणि मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गंभीर दखल घेतलीय. तातडीने अहवाल सादर करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. मध्यरात्री स्कूटीवरून घरी चाललेल्या तरूणीला धडक देऊन नंतर तिला सहा ते सात किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्या तरुणीचा विवस्त्र मृतदेह पोलिसांना सापडला होता. दरम्यान, पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram