National Bravery Award | महाराष्ट्रातील दोन मुलांचा बाल शौर्य पुरस्काराने सन्मान | ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रातल्या दोन बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झालाय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देण्यात येणाऱ्या या पुरस्कारात देशातल्या एकूण 22 बालकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे यांचा या यादीत समावेश आहे. 10 वर्षांच्या झेन सदावर्ते हिनं एका 16 मजली इमारतीत लागलेल्या आगीतून आपल्या शेजाऱ्यांची सुटका केली होती. तर पंधरा वर्षांच्या आकाश खिल्लारे यानं नदीत बुडणाऱ्या एका महिलेचा आणि तिच्या तीन वर्षांच्या बाळाचा जीव वाचवला होता. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
Continues below advertisement