Navratri : तेलंगणात कन्यका परमेश्वरी देवीसाठी साडेचार कोटी रुपयांच्या नोटांची सजावट, गाभाराही नोटांनी सजला

Continues below advertisement

हैदराबाद : नवरात्रीच्या निमित्ताने देशभरात देवीच्या मंदिरांना अनेक प्रकारे सजवलं जातं. त्यामध्ये विविध फुलांचा किंवा इतर गोष्टींचा वापर केला जातोय. तेलंगणाच्या मेहबूबनगरमध्ये कन्यका परमेश्वरी देवीची नवरात्री निमित्तानं भक्तांनी अर्पण केलेल्या दानाने सजावट करण्यात आली आहे. वर्षभरात देवीला भक्तांनी अर्पण केलेल्या रुपयांच्या नोटांनी हे मंदिर सजवण्यात आलंय. एकूण 4 कोटी 44 लाख 44 हजार 44 रुपयांच्या नोटांनी देवीचं मंदिर सजवण्यात आलंय. केवळ देवीचा मखरच नाही तर मंदिरातल्या भिंतींवरही नोटांची सजावट करण्यात आलेय. 2000, 500, 200, 100 च्या नोटांची फुलं बनवून ते देवीला अर्पण करण्यात आलंय. या सजावटीची आता चांगलीच चर्चा सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram