Terrorist Attack : Dawood चं मुंबई टार्गेट उधळलं! सणांच्या काळात दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न फेल
Terrorist Arrested : दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने या दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गटाचे लोक दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट करणार होते आणि त्यांचं लक्ष्य गर्दीच्या ठिकाणी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय यूपी आणि राजस्थानमधून चौघांना अटक करण्यात आली आहे.